स्वागत असो....
चातकाने पावसाची वाट पाहावी
अगदी तशीच तुझ्या आगमनाची आतुरता....
तयारी पूर्ण झाली स्वागताची
वेळ आता आमच्या संयमाची
वाळवंटात आस जशी पाण्याची
अगदी तशीच तुझ्या आगमनाची आतुरता.......
वेळ आता आमच्या संयमाची
वाळवंटात आस जशी पाण्याची
अगदी तशीच तुझ्या आगमनाची आतुरता.......
तू आलास .........
माता पित्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी
पूर्व जन्मीच्या वचनांना जागण्यासाठी
मिसाळ कुटुंबाला आनंद देण्यासाठी
"संकल्प" मंदिराला कळस चढवण्यासाठी
संस्कृती उत्थानाच्या कार्यासाठी
अपूर्ण "संकल्पांना" पूर्ण करण्यासाठी.....
माता पित्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी
पूर्व जन्मीच्या वचनांना जागण्यासाठी
मिसाळ कुटुंबाला आनंद देण्यासाठी
"संकल्प" मंदिराला कळस चढवण्यासाठी
संस्कृती उत्थानाच्या कार्यासाठी
अपूर्ण "संकल्पांना" पूर्ण करण्यासाठी.....
तू आलास......
आजी आजोबांना हसवण्यासाठी
कोमेजल्या कळ्यांना फुलवण्यासाठी
एका नवीन पर्वाचा आरंभ करण्यासाठी
पराभवावर मात करून विजयी होण्यासाठी........
आजी आजोबांना हसवण्यासाठी
कोमेजल्या कळ्यांना फुलवण्यासाठी
एका नवीन पर्वाचा आरंभ करण्यासाठी
पराभवावर मात करून विजयी होण्यासाठी........
तू आलास.....
आमच्या हृदयावर तुम्ही सदैव करणार राज
म्हणून आम्ही वंदितो तुम्हा "युवराज".................
आमच्या हृदयावर तुम्ही सदैव करणार राज
म्हणून आम्ही वंदितो तुम्हा "युवराज".................
©स्वलिखीत
प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845
औरंगाबाद.
7588075845
No comments:
Post a Comment