Tuesday, 25 April 2017

यौवन



यौवन हा आयुष्यातील आत्यंतीक महत्त्वाचा काळ , कळ्यांनी फुलण्याचा, पाखरांनी उडण्याचा, वेलींनी पसरण्याचा काळ म्हणजे यौवन ,सुवर्ण क्षणांचा संच म्हणजे यौवन, जीवनातील वसंत म्हणजे यौवन , मोठी स्वप्नं बघण्याचा त्या स्वप्नपुर्तीसाठी चालणार्या संघर्षाचा काळ �म्हणजे यौवन आणि असाच यौवनाने भरलेला तरूण देश म्हणजेच आपला भारत देश ....
एवढे तरूण असुनही अजून आपण मागे का? प्रत्येकाने विचार करायलाच हवा. आयुष्यातील हा वसंत असुनही आमचं तारूण्य वाया चाललंय ते पाश्चिमात्यांच्या अनुकरणात जीथे प्रेमाच्या नावाखाली व्याभीचाराचा बाजार थाटलेला आहे.
ज्या स्वप्नांसाठी आपण जगावं ,जी उम्मेद आपल्यात असावी ती सोडून फक्त घराच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं यालाच आपले यश मानणारी पिढी उदयास येतेय म्हणून भिती वाटते , शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील  मावळे सुध्दा दुसऱ्यांकडे चाकरीसाठी लाचारी पत्करतायेत म्हणून भिती वाटते, जींकणं शिकवणार्या कृष्णाला मानणारी लोकं हरण्याची नि मरणाची भाषा करत आहोत म्हणुन भिती वाटते ,ज्यांच्या भरवशावर डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलामांनी भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न बघीतले ती पिढी व्यसनाधीन बनतेय म्हणुन भिती वाटते आणि भिती वाटते कारण तरूण आज स्वतःची अोळखच विसरून बसलाय !!!

आठवा आपण कुणाचे वंशज आहेात?
गणिताला गती देणारे आर्यभट्ट, अणुचा शोध लावणारे महर्षी कणाद,धर्म अध्यात्म सांगणारे संत, संविधान देऊन युवकांना एक दिशा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाचे महत्व वाढवणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले,  यांच्या पुढील पिढ्या अश्या� षंढ निघाव्यात ?
मुळीच शक्य नाही हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे ......

©स्वलिखीत 
-प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845

Sunday, 2 April 2017

हे गरुडा घे भरारी.....

पेटव मनातील चिंगारी
हे गरुडा घे भरारी....

लोकांच्या तू पाया पडतो
दुर्जनांची भक्ती करतो
भोगासाठी इमान विकतो
का पत्करतो तू लाचारी ....

कामचुकारी नेहमी करतो
बंधनांना तू वैरी मानतो
कारणांची माला रचतो
कसा बनशील तू करारी....

इतरांचे ऐकून जगतो
प्रतिक्षणाला मत बदलतो
कर्तृत्वाचे ध्येय विसरतो
कशी मदत करेल मुरारी....

चेहऱ्यावरील हास्य लपवतो
मनातील दुःख तू दाखवतो
कातडी पांघरून वाघ बनतो
का बनसी रे तू मदारी.....

रक्ताला तू उसळू दे
आळसाला त्यागून दे
पर्वा जगाची सोडून दे
विजयाची तू गुढी उभारी.....

भीतीवरती विजय मिळव
लपलेल्या कर्तुत्वा जागव
क्रांतिकारी इतिहास घडव
वाजव नीर्घोषाची तुतारी....

©स्वलिखीत 
-प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845

सजदे में तुम्हारे हमें झुकने दो....

जब से तेरा प्यार मिला है  शायद खुद को खो दिया है थोड़ा ही सही प्यार निभाने दो  सजदे में तुम्हारे हमें झुकने दो.... भरी आंखों से ...