Friday, 11 August 2017

HOLD MY HAND....

HOLD MY HAND....

I am stable in storming sand
Only coz you hold my hand ....

The darkened worries stops me
The most loving now hates me
I am not who change the stand
Only coz you hold my hand ....

I don't bother what they think
Coz none was there when I sink
I won'tt leave the selected strand
Only coz you hold my hand .....

Destiny perished all my plans
Warned me with extra norms
I will conquer all the shand
Only coz you hold my hand....

Forgive me for any mistake
Let me try to return your stake
No happiness will be grand
If you stop to hold my hand....
If you stop......


©Written By-
PRADIPT...(Prof. Pradip Warade)
Aurangabad
7588075845

Wednesday, 2 August 2017

RELATIVES and RELATIONS

RELATIVES and RELATIONS

By birth we get the relatives which we have to “maintain” in the entire life. Here “maintain” means a burden. We don’t have the right to choose the relatives but the relations.
Our nature and way of living decides our relations .We have the complete authority to select the relations without any duty or responsibility.

-Relations APPRECIATES/ Relatives DEPRECIATES

Relations always help us to grow, motivate us to achieve more and more .They appreciates our decision though they don’t know anything about our field where as the Relatives help us to go deep and deep in the “BOG” .They always disagree with our decision their statements are like “why are you wasting your time and money? One of my friend’s son was very clever but he couldn’t ……so I think it’s very hard “

-Relatives are LIABILITY / Relations are ASSET

Relatives always expect something from us. Their complaints are like ‘you don’t give any time; you don’t care about us ….’ This happens only when we have achieved something and made busy ourselves in the work. No one was ready to call or meet you when you eagerly needed them but as you got stuck with the work they are ready to curse you…..”he is a big businessman/ busy man….” Relations never expect from us they just provides the support and the ever required help may psychological or emotional. Ask them the question you will get the answer .They can read our face. Decisions can be easy with them .They are always with us when we strongly needs them.


-SUCCESS by converting RELATIVES into RELATIONS

I heard about the successful syndicates made by various communities (relatives) they are giving the complete support to their relatives to uplift them from their present situations.They just convert the Relatives into Relations.As soon as we convert the relatives into relations,all the liabilities are going to be our asset and the higher is the assets the higher is the profit in the business (LIFE)..

Thanks & Regards,



©Written By-
PRADIPT...(Prof. Pradip Warade)
Aurangabad
7588075845

Friday, 12 May 2017

मुसाफिर हूं......

       मुसाफिर हूं......

जाने क्यूँ लोग कहते कि काफिर हूं
राह चलता मैं तो बस एक मुसाफिर हूं......

समझ नहि आते ये बातें लोगो की
कभी तारीफ तो कभी तौहीन की
भौकते है लोग मैं जिता "उसके" खातीर हूं
राह चलता.....

दुनिया वाले डूब रहे है पैसो के समन्दर में
जिंदगी गवां रहे है कागजों कि कश्ती में
अपने लिये जी लूं इतना मैं शातीर हूं
राह चलता.....

बिना मेहनत के आसमाँ छुना चाहते है
पल में रुका दे जिंदगी ऐसे शौक पालतें है
खुद कमाके खाऊं इतना मैं काबिल हूं
राह चलता.....

कहते कुछ तो दिल में छिपाते कुछ और है
माँ बाप भी बच्चो को सिखाते कुछ और है
जिंदगी से सिखो यही कहने हाजिर हूं....
राह चलता.....


©स्वलिखीत 
प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845

Monday, 8 May 2017

*रक्त सळसळते*

*रक्त सळसळते*

गुदमरल्या श्वासाने आज माझी मायभूमी विव्हळते
आठव पुत्रा तुझ्यामध्ये ही रक्त आहे सळसळते ।।

तरुणांचा देश ऐसा मागास कैसा
पोकळ गप्पा नसे जवळ फुटका पैसा
लाचार युवाना पाहून अंतःकरण कळवळते...

स्वप्नात जगण्याची हौस भारी
बापाच्या जीवावर मौज सारी
भ्रमित युवकातील कल्पकता गुदमरते.....

स्वतःकडून नसते कशाची अपेक्षा
सदैव स्वीकारे इतरांची उपेक्षा
तरुणाई देखील अंतर्मनात तडफडते....

नसे अभिमान माता पित्याचा
तीरस्कार मनी आप्त स्वकीयांचा
तिरस्कारी पुत्र पाहून मातृत्व विषन्नते.....

भिकारडे विचार त्यागून दे
कर्तुत्वाला जागवून दे
खडे बोल मग *प्रदीप्त* चे झनझनते...

आठव पुत्रा तुझ्यामध्ये ही रक्त आहे सळसळते ।।

©स्वलिखीत 
प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845

Tuesday, 25 April 2017

यौवन



यौवन हा आयुष्यातील आत्यंतीक महत्त्वाचा काळ , कळ्यांनी फुलण्याचा, पाखरांनी उडण्याचा, वेलींनी पसरण्याचा काळ म्हणजे यौवन ,सुवर्ण क्षणांचा संच म्हणजे यौवन, जीवनातील वसंत म्हणजे यौवन , मोठी स्वप्नं बघण्याचा त्या स्वप्नपुर्तीसाठी चालणार्या संघर्षाचा काळ �म्हणजे यौवन आणि असाच यौवनाने भरलेला तरूण देश म्हणजेच आपला भारत देश ....
एवढे तरूण असुनही अजून आपण मागे का? प्रत्येकाने विचार करायलाच हवा. आयुष्यातील हा वसंत असुनही आमचं तारूण्य वाया चाललंय ते पाश्चिमात्यांच्या अनुकरणात जीथे प्रेमाच्या नावाखाली व्याभीचाराचा बाजार थाटलेला आहे.
ज्या स्वप्नांसाठी आपण जगावं ,जी उम्मेद आपल्यात असावी ती सोडून फक्त घराच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं यालाच आपले यश मानणारी पिढी उदयास येतेय म्हणून भिती वाटते , शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील  मावळे सुध्दा दुसऱ्यांकडे चाकरीसाठी लाचारी पत्करतायेत म्हणून भिती वाटते, जींकणं शिकवणार्या कृष्णाला मानणारी लोकं हरण्याची नि मरणाची भाषा करत आहोत म्हणुन भिती वाटते ,ज्यांच्या भरवशावर डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलामांनी भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न बघीतले ती पिढी व्यसनाधीन बनतेय म्हणुन भिती वाटते आणि भिती वाटते कारण तरूण आज स्वतःची अोळखच विसरून बसलाय !!!

आठवा आपण कुणाचे वंशज आहेात?
गणिताला गती देणारे आर्यभट्ट, अणुचा शोध लावणारे महर्षी कणाद,धर्म अध्यात्म सांगणारे संत, संविधान देऊन युवकांना एक दिशा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाचे महत्व वाढवणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले,  यांच्या पुढील पिढ्या अश्या� षंढ निघाव्यात ?
मुळीच शक्य नाही हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे ......

©स्वलिखीत 
-प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845

Sunday, 2 April 2017

हे गरुडा घे भरारी.....

पेटव मनातील चिंगारी
हे गरुडा घे भरारी....

लोकांच्या तू पाया पडतो
दुर्जनांची भक्ती करतो
भोगासाठी इमान विकतो
का पत्करतो तू लाचारी ....

कामचुकारी नेहमी करतो
बंधनांना तू वैरी मानतो
कारणांची माला रचतो
कसा बनशील तू करारी....

इतरांचे ऐकून जगतो
प्रतिक्षणाला मत बदलतो
कर्तृत्वाचे ध्येय विसरतो
कशी मदत करेल मुरारी....

चेहऱ्यावरील हास्य लपवतो
मनातील दुःख तू दाखवतो
कातडी पांघरून वाघ बनतो
का बनसी रे तू मदारी.....

रक्ताला तू उसळू दे
आळसाला त्यागून दे
पर्वा जगाची सोडून दे
विजयाची तू गुढी उभारी.....

भीतीवरती विजय मिळव
लपलेल्या कर्तुत्वा जागव
क्रांतिकारी इतिहास घडव
वाजव नीर्घोषाची तुतारी....

©स्वलिखीत 
-प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845

Friday, 31 March 2017

निर्णय घेताना....




आयुष्यात एकदा तरी काही वेडेपणा करावा सर्व काही सुरळीत चालू असताना काही वेगळं करून बघावं  जे आनंद देईल जगणं शिकवल,रोज रोज तेच तेच करुन जगणं ही सामान्य होईल कारण रोज घडणारी घटना सुद्धा "सामान्य घटना" म्हणून अोळखली जाते.
जन्माला येताना भलेही आपण सामान्य असू पण मरताना मात्र मरण" असामान्य" असावं.ज्या आयुष्याकडे बघून  लोकांनीही म्हणावं जगावं तर असलं "जीणं" नाही तर श्वास प्राणी ही घेतात, लौकिक असा मिळवावा जो प्रेरणादायी असेल कुविख्यात तर गुंडही होतात, एखाद्याला उभं करावं कारण पाडणारे तर आपलेही असतात ...
जन्माला येताना श्वास होता पण नाव नव्हतं मरतांना श्वास नसेन पण नाव मात्र प्रत्येकाच्या  ह्रदयावर कोरलेले असेल ते जगणं.......
पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासा पर्यंतचा प्रवास म्हणजे काय जगणं !!
जगणं म्हणजे एक संधी खुप काही कमावन्याची मैत्री,नाती , ज्ञान यांचे संकलन करण्याची, अशी संधी मिळुन ही जर आपण फक्त जीभेचे वा शरीराचे चोचले पुरवीन्यासाठीच जगत असु तर अश्या जगण्याला काय अर्थ आहे ?

जगायचंच तर त्या सिंहासारखं जो जगतो स्वतच्या धुंदीत कुणाचीही तमा न बाळगता,जगायचच तर त्या फुलाप्रमाणं जे जगतं एकच दिवस पण सगळ्यांना आपलंसं करूण घेतं, अरे जगणं शिकावं त्या फुलपाखरा कडुन जे फक्त 14 च दिवस जगत पण नेहमी हसत खेळत ,बागडत,आनंद घेत नि आनंद देत ........


©स्वलिखीत 
-प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845

एक वेड.....कर्तुत्वाचं......

असतं एखाद्याला वेड काही वेगळं करण्याचं  प्रवाहाच्या विरूद्ध वाहण्याचं म्हणून काय सगळ्यांनी त्यांना वेडं ठरवायचं ?
 तसं असेल तर आहेच ती लोकं वेडी "ध्येयवेडी", ध्येय प्राप्तीसाठी पिसाटलेली , कुणाचीही पर्वा न करता स्वतःच्या मस्तीत जगणारी, हवं ते करणारी  कदाचीत ते जाणतात, त्यांना वेडं ठरवणारा हाच समाज उद्या त्यांचं गुणगान करताना कधीही थकणार नाही त्यामुळंच ती असं वागतात आणी जींकुन घेतात जगाला आणि जगातील सर्वांच्या ह्रदयालासुद्धा .....

जग जिंकण्यापेक्षा ह्रदय जिंकायला जास्त ताकत लागते .पैशाने भलेही जग विकत घेता येईल पण ह्रदय जींकण्यासाठी अख्ख्ये जीवनही कमी पडते ... म्हणुनच त्यांनी ठरवले पैसा मिळवण्यापेक्षा ह्रदय जिंकायचे आणी झोकून दिले स्वतःला अशा कामात ज्यामध्ये त्यांना आवड होती .....
NASA मध्ये न जाता ISRO ला जगात महत्वाचे स्थान मिळवून देणारे डाॅ . ए पि जे अब्दुल कलाम, पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या मुलापासून तर जगावर राज्य करण्याची अपेक्षा पुर्ती करणारे धिरुभाई अंबानी, देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून लढणारे स्वातंत्र्य सेनानी , जीवाची पर्वा न करता स्वराज्य स्थापनेसाठी लढणारे मावळे यांना देखिल वेडातच काढले होते नं !!!
"वेडात मराठे विर दौडले सात ....."
त्यांना वेड्यात काढणारे  जन्माला आलेही आणी गेलेही पण हे वेडेच कायम स्मरणात राहिले माझ्या, तुझ्या ,ह्यांच्या आणि आपल्या सर्वाच्या ....

"आपण जन्माला आलो ते इतिहास वाचायला नाही तर इतिहास रचायला "
ही जाणीव रक्तात उतरवून जगणारी ही ध्येयवेडी पिढी जगाला अोरडून सांगत आहे , पुरातन विचार फक्त वाचनाची वेळ आता संपली आहे,  आता वेळ आहे वाचलेलं जीवन जगण्याची, साचलेली मरगळ झटकण्याची , काहीतरी वेगळं करून दाखवण्याची, आपल्यातल्या कर्तृत्वाला बाहेर काढण्याची आणि संपूर्ण जगातील प्रत्येकाच्या ह्रदयाला जींकण्याची....

©
------स्वलिखीत -------
प्रा. प्रदीप वराडे
(इन्फिनीटी क्लासेस ,अौरंगाबाद)
7588075845

शिक्षक....

शिक्षक

शिक्षकाचाही एखादा
आदर्श शिक्षक असावा
विद्यार्थ्यांच्याच नाही तर
शिक्षकांच्याही मनी बसावा

चुकले जरी कुणाचे
तरी हळूच गाली हसावा
हसवून सारे समजावने
मनी अहं कधी नसावा

पाहताच त्यांना जीवनातला
त्राण सारा सरावा
देहरूपी नसेल तरी
'असा'भावरूपी उरावा

©स्वलिखीत 
-प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845

वडीलांसाठी दोन शब्द.....

*प्रदीप*महाराजांची आज्ञा शिरसावंध्य मानून गंगेशी विवाह करणारे *शंतनू* महाराज , आपल्या पित्याला नागकन्येशी विवाह करता यावा यासाठी ब्रम्हचर्याची प्रतिज्ञा करणारे *देवव्रत* जो त्या प्रतिज्ञेमुळे *भीष्म* बनला.
तिन्ही लोकांवर्ती (पृथ्वी,आकाश आणि पातळ) राज्य करणारा *मरुत* राजा ज्याच्या राज्याची इंद्रालाही ईर्ष्या झाली; *तो* घडला केवळ आपल्या पित्याच्या शौर्य आणि संस्कारामुळं,दशरथ राजाने दिलेला *प्राण जाये पण वचन ना जाये* चा संस्कार जगणारे *प्रभूराम*असेल वा स्वतःच्या शौर्याने  सर्वाना दिपवून टाकणारा चक्रवर्ती सम्राट *भरत* (आदिपर्वानुसार दुष्यंत आणि शकुंतलेचा पुत्र) असेल या सर्वांना घडवणारे त्यांचे पिता याना प्रथम अभिवादन ....

संस्कारातून तुमच्या आम्ही नकळत शिकतो चारित्र्यातून तुमच्या आमचे आयुष्य घडवितो ,
जगताना तुम्ही अनेक खस्ता खाल्ल्या पण हार कधी न पत्करली,
हसत खेळत नेहमी आम्हाला नवी दिशा दावली.
*आयुष्य कस असावं ?*
नितळ पाण्यासारख शांत पण खळखळणारं तेजोमय पण चंद्रासारखं शीतल .... एवढं सगळं सांगण्यापेक्षा सरळ *तुमच्यासारखं* असावं .
*स्वतःला दुसर्यापेक्षा नाही तर स्वतःपेक्षा मोठं बनव*
*एक संधी गेली हरकत नाही ती आपल्यासाठी नव्हतीच आपल्यासाठी यापेक्षा भारी संधी तयार होतेय ....*.
हे सांगुण तुम्ही जो आत्मविश्वास वाढवला त्यामुळेच इथपर्यंतचा प्रवास शक्य झालाय....
खूप दिलंत 'पपा तुम्ही आजपर्यंत देतच आलात
"तुम्ही दुःखाची आसवं पिऊन आम्हाला सुखाची नदी दाखवलीत
आम्हाला नेहमीच तुम्ही दिवाळी दिली
ज्यासाठी स्वतःच्या स्वप्नाची होळी केली"
आमच्या साठी एवढं करून कधीच अपेक्षा देखील ठेवली नाही कशाची ! ठेऊन तरी काय! आम्ही तरी काय देवू शकतो ! आवडेल कि नाही माहीत नाही पण प्रयत्न करतोय .....
आमच्या सर्वांकडून छोटीशी भेट.....
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा......

©स्वलिखीत 
प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845

जरा ठरवूया आपण येणाऱ्या पिढ्यांना काय देणार ?

"काय बनून जन्माला यायचं! हे आपल्या हातात नसत पण जन्माला आल्यानंतर काय बनायचं !” हे मात्र आपल्याच हातात असत.
“चिंधी” बनून जन्माला आलेली कन्या आज स्वकर्तुत्वाने “सिंधुताई” (माई) म्हणून ओळखली जाते,विज्ञानातील आधुनिक किरणांचा शोध लावताना जीवन गमवावे लागले तरी मरेपर्यंत त्यावर अभ्यास करणारी डॉक्टर मेरी क्युरी, सुराज्यानिर्मितीसाठी पतीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी राजगादी सांभाळणाऱ्या अहिल्याबाई होळकर, व्हीलचेअर वरती   असून सुद्धा “ Jindal saw Ltd. ” सांभाळून पहिली महिला उद्योजिका ठरलेल्या “स्मिणु जिंदाल”, देशासाठी पळणारी पी.टी.उषा आणि स्वत:च संपूर्ण बालपण कुस्तीसाठी त्यागून देणाऱ्या गीता आणि बबिता,या सर्वामध्ये एकच गोष्ट सारखी ती म्हणजे काय बनायचं हे त्यांनी निश्चित केल.यादेखील महिलाच पण यांनी संसार साम्भाळून त्यांनी बदलवल स्वताला घरातील प्रत्येकाला, ज्यांनी ऐकल त्यांच्या सोबत ज्यांनी नाही ऐकल त्यांच्या शिवाय जे मिळवायचं ते मिळवलं. अतूट श्रद्धा होती त्यांची स्वत:वर, म्हणूनच तर त्यांना सगळे कितीहि वाईट म्हटले, कितीही हस्ले तरीही अपयशात कधीही त्यांनी हार पत्करली नाही.
"सूर्य मावळत असताना सुद्धा त्यांना ती नव्या दिवसाची सुरुवात वाटायची, ज्या गुलाबाकडे बघून प्रेमकाव्य सुचाव त्या गुलाबाला  बघून त्याच्या कर्तुत्वातून -सुवास देण्याच्या वृत्तीतून समाजासाठी झिजण्याची प्रेरणा त्यांना मिळायची. ”
J D ANVIN च्या म्हणण्यानुसार “स्त्री हीच राष्ट्राच्या स्थितीसाठी जबाबदार असते” म्हणूनच तर स्वराज्यातील खंबीर असणारी जिजामाता विचारी असल्यानेच प्रत्येकाच्या स्वप्नातील स्वराज्य अस्तित्वात आले."स्त्री” जेव्हा लाचार बनते तेव्हा देशही लाचार बनतो....
कळत नकळत पश्च्यात्यांच्या  अनुकरनातून भारतीय नारी लाचार तर बनत नाहीये न ? HAIR STYLE च्या नादात LIFE STYLE तर विसरत नाहीये न? SELFI पायी स्वताची ओळख तर गमावणार नाही न? BEAUTY PARLOUR ने चेहरा साफ करता येईल पण मनाच काय?
आपल्यालाहि आता विचार करायला हव,विझणार्या तेजाला जागवायला हव,गती द्यावी त्या विचारचक्राला आणि थांबवावे त्या अविचाराला.....जरा  ठरवूया आपण येणाऱ्या पिढ्यांना काय देणार ?
“पाश्चात्यांचे अंध अनुकरण कि आपले ( भारतीय ) प्रेरणादायी जीवन .......?”

©स्वलिखीत 
प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845

विझणार ना कधी.....

हरणार ना कधी मी
थांबणार ना कधी
लागली जी आग आता
विझणार ना कधी //
अनंत येतील अडचणी
दुःखही असतील क्षणोक्षणी
संकटाना सामोरे जाऊन मी
थकणार  ना कधी //
सागरालाही पार करेल
हिमालयाला चूर्ण करेल
शत्रुच्या सामर्थ्याची चिंता मी
करणार ना कधी //
आयुष्याला आजमावण्यासाठी
स्वताला सिद्ध करण्यासाठी
सज्ज झालेला मी माघारी
फिरणार ना कधी //
स्वप्न बाळगून उराशी
झालोय निश्चयी मनाशी
स्वीकारलेल्या आव्हानांपासून
ढळणार ना कधी //

©स्वलिखीत 
प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845

उम्मीद....

उम्मीद....

जिंदगी की हर ख्वाईश तू पुरी कर
ख्वाईशौ की कभी नुमाईश ना कर

मिल जायेगी वह मंजिल तुझे
जो तेरी जान ले रही थी,
वही बन जायेगी जान तेरी
बस थोडा सब्र तो कर...

कडी मेहनत है करनी तुझे
पाना वही जीसकी तुझे आस थी,
आसमाँ भी झुक जायेगा निचे
बस थोडी कोशिश तो कर....

जीना तेरा यादगार बना दें
हर किसी को प्यार से अपनालें
प्यार से तू दुनिया जीत लेगा
बस थोडा हासील तो कर ...

युंही निकल जायेंगेे मुष्कीलभरे पल
हर अंधेरे के बाद सवेरा होगा कल
फिर जिंदगी में खुषहाली करेगी राज
बस थोडी उम्मीद तो कर......

©स्वलिखीत 
प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845

सजदे में तुम्हारे हमें झुकने दो....

जब से तेरा प्यार मिला है  शायद खुद को खो दिया है थोड़ा ही सही प्यार निभाने दो  सजदे में तुम्हारे हमें झुकने दो.... भरी आंखों से ...