Friday, 31 March 2017

विझणार ना कधी.....

हरणार ना कधी मी
थांबणार ना कधी
लागली जी आग आता
विझणार ना कधी //
अनंत येतील अडचणी
दुःखही असतील क्षणोक्षणी
संकटाना सामोरे जाऊन मी
थकणार  ना कधी //
सागरालाही पार करेल
हिमालयाला चूर्ण करेल
शत्रुच्या सामर्थ्याची चिंता मी
करणार ना कधी //
आयुष्याला आजमावण्यासाठी
स्वताला सिद्ध करण्यासाठी
सज्ज झालेला मी माघारी
फिरणार ना कधी //
स्वप्न बाळगून उराशी
झालोय निश्चयी मनाशी
स्वीकारलेल्या आव्हानांपासून
ढळणार ना कधी //

©स्वलिखीत 
प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845

1 comment:

सजदे में तुम्हारे हमें झुकने दो....

जब से तेरा प्यार मिला है  शायद खुद को खो दिया है थोड़ा ही सही प्यार निभाने दो  सजदे में तुम्हारे हमें झुकने दो.... भरी आंखों से ...