Friday, 31 March 2017

एक वेड.....कर्तुत्वाचं......

असतं एखाद्याला वेड काही वेगळं करण्याचं  प्रवाहाच्या विरूद्ध वाहण्याचं म्हणून काय सगळ्यांनी त्यांना वेडं ठरवायचं ?
 तसं असेल तर आहेच ती लोकं वेडी "ध्येयवेडी", ध्येय प्राप्तीसाठी पिसाटलेली , कुणाचीही पर्वा न करता स्वतःच्या मस्तीत जगणारी, हवं ते करणारी  कदाचीत ते जाणतात, त्यांना वेडं ठरवणारा हाच समाज उद्या त्यांचं गुणगान करताना कधीही थकणार नाही त्यामुळंच ती असं वागतात आणी जींकुन घेतात जगाला आणि जगातील सर्वांच्या ह्रदयालासुद्धा .....

जग जिंकण्यापेक्षा ह्रदय जिंकायला जास्त ताकत लागते .पैशाने भलेही जग विकत घेता येईल पण ह्रदय जींकण्यासाठी अख्ख्ये जीवनही कमी पडते ... म्हणुनच त्यांनी ठरवले पैसा मिळवण्यापेक्षा ह्रदय जिंकायचे आणी झोकून दिले स्वतःला अशा कामात ज्यामध्ये त्यांना आवड होती .....
NASA मध्ये न जाता ISRO ला जगात महत्वाचे स्थान मिळवून देणारे डाॅ . ए पि जे अब्दुल कलाम, पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या मुलापासून तर जगावर राज्य करण्याची अपेक्षा पुर्ती करणारे धिरुभाई अंबानी, देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून लढणारे स्वातंत्र्य सेनानी , जीवाची पर्वा न करता स्वराज्य स्थापनेसाठी लढणारे मावळे यांना देखिल वेडातच काढले होते नं !!!
"वेडात मराठे विर दौडले सात ....."
त्यांना वेड्यात काढणारे  जन्माला आलेही आणी गेलेही पण हे वेडेच कायम स्मरणात राहिले माझ्या, तुझ्या ,ह्यांच्या आणि आपल्या सर्वाच्या ....

"आपण जन्माला आलो ते इतिहास वाचायला नाही तर इतिहास रचायला "
ही जाणीव रक्तात उतरवून जगणारी ही ध्येयवेडी पिढी जगाला अोरडून सांगत आहे , पुरातन विचार फक्त वाचनाची वेळ आता संपली आहे,  आता वेळ आहे वाचलेलं जीवन जगण्याची, साचलेली मरगळ झटकण्याची , काहीतरी वेगळं करून दाखवण्याची, आपल्यातल्या कर्तृत्वाला बाहेर काढण्याची आणि संपूर्ण जगातील प्रत्येकाच्या ह्रदयाला जींकण्याची....

©
------स्वलिखीत -------
प्रा. प्रदीप वराडे
(इन्फिनीटी क्लासेस ,अौरंगाबाद)
7588075845

No comments:

Post a Comment

सजदे में तुम्हारे हमें झुकने दो....

जब से तेरा प्यार मिला है  शायद खुद को खो दिया है थोड़ा ही सही प्यार निभाने दो  सजदे में तुम्हारे हमें झुकने दो.... भरी आंखों से ...