Wednesday, 14 February 2018

बाळा तू गुणवंत हो !!

बाळा तू गुणवंत हो !!

विश्वातील सर्वश्रेष्ठ असा
जनमनात राज्य करणारा
कर्तृत्वाने जीवन फुलवणारा
यशवंताचा किर्तीवंत हो !!
बाळा तू गुणवंत हो !!
बुद्धीने परिपूर्ण असा
आत्मज्ञान मिळवणारा
अस्तित्वाला सिद्ध करणारा
यशवंताचा प्रज्ञावंत हो !!
बाळा तू गुणवंत हो !!
स्वचारित्र्य घडवेल असा
सर्वांचा आदर करणारा
जगाला प्रेमाने जिंकणारा
यशवंताचा शिलवंत हो !!
बाळा तू गुणवंत हो !!
पदोपदी जागरूक असा
माता पित्यांचे ऋण जाणणारा
समाजाला अंतिम मानणारा
यशवंताचा जयवंत हो !!
बाळा तू गुणवंत हो !!

©स्वलिखीत 
-प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845



No comments:

Post a Comment

सजदे में तुम्हारे हमें झुकने दो....

जब से तेरा प्यार मिला है  शायद खुद को खो दिया है थोड़ा ही सही प्यार निभाने दो  सजदे में तुम्हारे हमें झुकने दो.... भरी आंखों से ...