Wednesday, 14 February 2018

Boys Movie Review...

Boys Movie Review...

प्रत्येकामध्ये एक "ढुंग्या" आणि "धैऱ्या " लपलेला असतो गरज असते ती त्यांना जागवण्याची,त्यांना बाहेर काढण्याची स्वतःमध्ये लपलेल्यांना बाहेर काढाल तरच खऱ्या आयुष्याला भेटता येईल ....
कोंदटलेल्या ,बुरसटलेल्या न आवडणाऱ्या पण पर्यायाने नशिबी आलेल्या आयुष्याला जगणारे आपण सगळेजण.....का जगतोय? याच उत्तर कधीच मिळत नाही तरीही आलेला दिवस कसातरी कण्हत कुढत काढायचा अन येणाऱ्या दिवसाला सामोरं जायचं ,रोज रोज नवीन समस्यांचे ताशे गिरवायचे , त्यांचं tension घ्यायचं पण तो problem "आज ना छोडुंगा तुझे" म्हणत आपली साथ काही सोडत नाही आणि तो सुटत नाही म्हणून आपण रडत बसायचं .......
असं वागलं तर तिला आवडंल का? त्याला नाही आवडलं तर ? हा विचार करताना आपल्यामधील "म"ला आवडेल का ? याचा विचारच करायला विसरतो ....
गावाकडून शहरात येताना कितीतरी अपेक्षा स्वप्न घेऊन आलेलो असतो पण इथे वावरताना स्वतःतील "स्व"ला विसरून दुसऱ्यांसारखं वागायला लागतो, त्यांना follow करतो आणी स्वतःला civilized समजतो पुन्हा ते करताना मोठ्याने हसायला नको,कुणाशी जास्त बोललो तर ते मला वेंधळा समजतील त्यांना आपली किंमत राहणार नाही असं विचार करणारी आपली "सुधारित आवृत्ती" समोर येते ज्यातील "सत्व" आणि "स्वत्व" दोन्हीही हरवलेले असतात ज्यामुळे जीव गुदमरतो आणि जगण्यावरील प्रेम हळू हळू कमी होऊ लागतं.....
अशावेळी अनेक प्रश्न समोर घेऊन आपल्यातील "कबीर" बाहेर येतो आणि मग जिंकणं सुद्धा पराजयापेक्षा जास्त सलायला लागतं. जिंकणं celebrate करायला देखील कुणी नसतं ....
चित्रपटातील व आयुष्यातील "कबीर" ला हरवण्यासाठी "आपण आपण आहे" असं म्हणणारा दगडू "आम्ही लग्नाळू" म्हणत लग्नासारखं आव्हान स्वीकारणारा ढुंग्या किंवा "कसल्याही परिस्थितीत हसणारा" धैऱ्या या सगळ्यांकडून एक गोष्ट शिकण्यासारखी "LIFE IS THE CELEBRATION ...."
FULL DHAMAL MOVIE
हसत खेळत आयुष्य शिकवणारा Boys movie नक्कीच मराठीसिनेसृष्टीतील एक नवा trendsetter ठरेल
खूप खूप शुभेच्छा
"TEAM BOYS"
©स्वलिखीत
प्रा.प्रदीप वराडे
औरंगाबाद
7588075845

No comments:

Post a Comment

सजदे में तुम्हारे हमें झुकने दो....

जब से तेरा प्यार मिला है  शायद खुद को खो दिया है थोड़ा ही सही प्यार निभाने दो  सजदे में तुम्हारे हमें झुकने दो.... भरी आंखों से ...