तू आलीस नि बदलवलंस मला....
नव्हती सवय कधी वाट बघण्याची
तरी तुझा चेहरा पाहन्यासाठी तासन तास थांबलो
थांबूनही जीव हा कधी न दमला....
तू आलीस.....
तरी तुझा चेहरा पाहन्यासाठी तासन तास थांबलो
थांबूनही जीव हा कधी न दमला....
तू आलीस.....
नव्हती सवय कधी ऐकण्याची
तु समोर असताना ऐकावच वाटतं
नाही ऐकलं तर आभाळ मनात दाटतं
दाटलेल्या मनातील आभाळाला रस्ता तू दाखवला....
तू आलीस......
तु समोर असताना ऐकावच वाटतं
नाही ऐकलं तर आभाळ मनात दाटतं
दाटलेल्या मनातील आभाळाला रस्ता तू दाखवला....
तू आलीस......
निर्णयातील साथीदार तू बनलिस
सुख दुखातील भागीदार झालीस
त्यागातही आनंद हे शिकवलंस मला.....
तू आलीस......
सुख दुखातील भागीदार झालीस
त्यागातही आनंद हे शिकवलंस मला.....
तू आलीस......
जन्मजन्मांतरीची पुण्याई ती असावी
ज्यायोगे माझ्या जीवनात तू यावी
तू आलीस नि खुलवलंस मला.....
ज्यायोगे माझ्या जीवनात तू यावी
तू आलीस नि खुलवलंस मला.....
माझ्या प्रत्येक क्षणात माझ्यासोबत असणारी *ती* एक वर्षांपूर्वी माझ्या जीवनात *सैराट* बनून आली,जिच्या स्वागतासाठी आपण सर्वांनी "झिंग झिंग झिंगाट" वरती भरपूर नाचलात, खुश होऊन वरून राजाने देखील हजेरी लावली त्या दिवसाला एक वर्ष पूर्ण होतंय.....
खूप खूप आभार मंजुषा .......
💐
©स्वलिखीत
-प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845
औरंगाबाद.
7588075845
💐
No comments:
Post a Comment