Friday, 31 March 2017

निर्णय घेताना....




आयुष्यात एकदा तरी काही वेडेपणा करावा सर्व काही सुरळीत चालू असताना काही वेगळं करून बघावं  जे आनंद देईल जगणं शिकवल,रोज रोज तेच तेच करुन जगणं ही सामान्य होईल कारण रोज घडणारी घटना सुद्धा "सामान्य घटना" म्हणून अोळखली जाते.
जन्माला येताना भलेही आपण सामान्य असू पण मरताना मात्र मरण" असामान्य" असावं.ज्या आयुष्याकडे बघून  लोकांनीही म्हणावं जगावं तर असलं "जीणं" नाही तर श्वास प्राणी ही घेतात, लौकिक असा मिळवावा जो प्रेरणादायी असेल कुविख्यात तर गुंडही होतात, एखाद्याला उभं करावं कारण पाडणारे तर आपलेही असतात ...
जन्माला येताना श्वास होता पण नाव नव्हतं मरतांना श्वास नसेन पण नाव मात्र प्रत्येकाच्या  ह्रदयावर कोरलेले असेल ते जगणं.......
पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासा पर्यंतचा प्रवास म्हणजे काय जगणं !!
जगणं म्हणजे एक संधी खुप काही कमावन्याची मैत्री,नाती , ज्ञान यांचे संकलन करण्याची, अशी संधी मिळुन ही जर आपण फक्त जीभेचे वा शरीराचे चोचले पुरवीन्यासाठीच जगत असु तर अश्या जगण्याला काय अर्थ आहे ?

जगायचंच तर त्या सिंहासारखं जो जगतो स्वतच्या धुंदीत कुणाचीही तमा न बाळगता,जगायचच तर त्या फुलाप्रमाणं जे जगतं एकच दिवस पण सगळ्यांना आपलंसं करूण घेतं, अरे जगणं शिकावं त्या फुलपाखरा कडुन जे फक्त 14 च दिवस जगत पण नेहमी हसत खेळत ,बागडत,आनंद घेत नि आनंद देत ........


©स्वलिखीत 
-प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)
औरंगाबाद.
7588075845

5 comments:

  1. Perfect motivation..
    Nice..
    :)

    ReplyDelete
  2. Perfect motivation..
    Nice..
    :)

    ReplyDelete
  3. वेडेपणात, वेडेपणाचा, "पण" मी केला, अन् लोक मला शहाणा म्हणून हिनवू लागले, इतक सुंदर लिहिलत सर, कौतुकास शब्द आपल्या कमी पडू लागले....

    ReplyDelete

सजदे में तुम्हारे हमें झुकने दो....

जब से तेरा प्यार मिला है  शायद खुद को खो दिया है थोड़ा ही सही प्यार निभाने दो  सजदे में तुम्हारे हमें झुकने दो.... भरी आंखों से ...