Thursday, 10 May 2018

Anniversary

माझ्या आयुष्यात येऊन आयुष्याला पूर्णत्व देणारी प्रिय मंजुषा लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .....

मन सैरभैर जेव्हा
नजर चेहर्यावरती स्थीरते
तन पैलतीर तेव्हा
स्वप्न नौकेवरती झुलते...

काळोख्या रात्रींतून
एक प्रकाशज्योत दिसते
चेहर्याचे स्मीत तुझे ते
आभासी प्रतीमा उमगते....

भरकटत्या मार्गावरती
पथदर्शीका हाती देते
चुकणार्या वळणावरती
अंधाची नजर तू बनते ....

चाहूल तुझी लागता
प्रेम झुळूक अलगद येते
हृदयाशी स्पर्शून जाता
मन आनंदी बागडते

पायाखालची वाळू नकळत सरकत जाते मागे खुपसाऱ्या पाऊलखुणा ठेऊन तशीच काही क्षणे विरून जातात मागे असंख्य सुवर्णस्मृती ठेऊन अश्या स्मृती आठवल्या तरी सहज ज्यात आपण हरवून बसतो ....

तू आयुष्यात आली जणू परीस बनूनच
ज्या ज्या क्षणांना तुझा स्पर्श झाला तो तो प्रत्येक क्षण आज सुवर्णक्षण बनलाय ....
हवा वाहताना किती oxygen सर्वाना दिला याचा हिशोब कधी करत नाही अगदी तसंच तुझं वागणं,सर्वांशी प्रेमाने बोलणं, हळूच ते लाजणं, गालातल्या गालात हसणं सर्वच अगदी निखळ असतं ...

कसकाय जमतं तुला ? एवढी कसाकाय हुशार हे राव ? पहा आता ......

©स्वलिखीत

 प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)

औरंगाबाद.7588075845

No comments:

Post a Comment

सजदे में तुम्हारे हमें झुकने दो....

जब से तेरा प्यार मिला है  शायद खुद को खो दिया है थोड़ा ही सही प्यार निभाने दो  सजदे में तुम्हारे हमें झुकने दो.... भरी आंखों से ...