Sunday, 13 May 2018

आई ...

अर्भक म्हणून घेतलेला पहिला श्वास म्हणजे आई 
आयुष्य मिळाल्यानंतरचं पहिलं प्रेम म्हणजे आई 

बोलताना अडखळायचो,
उठताना धडपडायचो,
चालताना थबकायचो,
तेव्हा सावरणारी पहिली तू म्हणजे आई ....

कर्तव्य दक्षतेची आठवण 
सोनेरी क्षणाची साठवण 
झालेल्या चुकांची पाठराखण
करणारी पहिली तू म्हणजे आई ...

शिवरायांना घडविणारी 
स्वप्नांना जागवणारी 
जीवन ध्येय दाखवणारी 
अन त्या वाटेवर चालवणारी पहिली तू म्हणजे आई....

अंगाई गीत गाउन 
जीवनगाणे शिकवणारी
आसवांना आनंदाश्रूंचं नाव देऊन 
रुदन लपवणारी  
पहिली तू म्हणजे आई...


खूप खूप धन्यवाद
जन्म देण्यासाठी एक मुलगा म्हणून ,एक शिक्षक म्हणून एक चांगला नागरिक म्हणून आज जे काही आहे त्या सर्वांची जननी तूच आहेस........ 

Happy mothers day .....

©स्वलिखीत

 प्रदीप्त (प्रा.प्रदिप वराडे)

औरंगाबाद.7588075845

No comments:

Post a Comment

सजदे में तुम्हारे हमें झुकने दो....

जब से तेरा प्यार मिला है  शायद खुद को खो दिया है थोड़ा ही सही प्यार निभाने दो  सजदे में तुम्हारे हमें झुकने दो.... भरी आंखों से ...