मला अंधार आवडतो...
कारण
तो मनातील भाव लपवतो,
आपल्यात लपलेल्या "स्व"ला खुलवतो,
चंद्र,चांदण्यांच्या साथीने देहभान विसरायला लावतो...
किती कमावलं?किती गमावलं? किती हसलो?
किती रडलो?सगळं सगळं विसरायला लावतो....
हरवलेल्या ज्या दिशा प्रकाशात कधी गवसल्या नाही त्या दिशा या अंधारात मिळतात....
रोज रात्री झालेल्या सगळ्या चुका पदरात घालून अलगद मिठीत घेतो तो अंधार...
सुखद क्षणांना आठवायला लावतो तो अंधार...
एकाकी सोडून समर्थ बनायला शिकवतो तो अंधार...
उगवत्या सूर्याला वाट मोकळी करून देतो तो खरा अंधार...
No comments:
Post a Comment